भूतकाळ पिच्छा सोडत नाही म्हणून
जाळून टाकले सारे आठ्वणींचे पुरावे
ज्वाळांच्या स्वाधीन केल्या डायऱ्या...
आणि शणात झालो फ़क्त वर्तमानपुरुष...
पण, शणापुरताच....!
काळ्याकुट्ट ढगान्सोबत घोंघावत आली
आठवणींची वट्वाघळे...
पहिल्या पावसाच्या थेंबान्नी अंगणातले
निष्पर्ण झाड तरारून ऊठले...
त्याचे प्रत्येक हिर्वेगार पान
होते माझ्या डायरीचे!
पानोपानी लगडल्यात माझ्या
आठवणी...!
कुणावर रक्तबंबाळ करणारे घाव,
तर कुणावर अलवार आठवणींचे ठसे...
जो पर्यंत काळ येत नाही तो पर्यंत
आठवणींची भूते अशीच येत राहाणार
हिरव्या पालवीच्या रूपात!
त्यान्ना एक थेंब ही पुरे
पावसाचा किन्वा आसवान्चा!