तळहातावर एकच मोती
नितळ गुलाबी दवबिंदूपरि
कधी कुठेसा
आठवातुनी हरवुन गेला---
तळहातावर वाळूचा कण
चमचमणाऱ्या सुवर्णापरी
शमादमाच्या जलधारांनी
धुवून गेला----
तळहातावर तलम रेशमी
शेव झुळझुळे
साद घालता समीरणाने
उडून गेला----
तळहातवर कधि ओघळला
तुझाच अश्रू
-----------तुझाच आठव
तळहातातच कैद जाहला----