टोमॅटो पुलाव

१५ मिनिटे
टोमॅटो चा उकडून रस काढून घ्यायचा. एक वाटी तांदळा साठी ३ मध्यम टोमॅटो घ्यायचे.का. ३ मध्यम कांद्याच्या चकत्या कराव्यात. rings मोकळ्या करून घ्याव्यात. flower चे तुरे, सिमला मिरचीचे तुकडे एकत्र एक वाटी. एक वाटी मटारचे दाणे. फोडणी साठी ४ वेलदोडे,दोन काड्या दालचिनी, ४-५ मिरी दाणे,३ लवंगा,जिरे घ्यावे. तांदुळ धुवून अर्धा तास भिजवावे.

वर सांगितलेला खडा मसाला घालून फोडणी करवी. कांद्याचे rings , flower , सिमला मिरची, मटार घालून परतावे. मग निथळलेले तांदुळ घालून परतावे.

आता थोडं तिखट, चवीला मीठ, आणी everest चा पुलाव मसाला घालावा ( नसेल तर गरम मसाला किंवा गोडा मसाला घालून करा. पण Everest च्या पुलाव मसाल्याची छान चव येते.)

आता तांदळाच्या दुप्पट पाणी घालावं आणी भात शिजवावा. भात बोट्चेपा झाला की टोमॅटो चा रस घालून sim वर १० मिनिटं शिजू द्यावं. गरमा गरम भातावर तुपाची धार सोडून खावं.

फ़क्त टोमटो चा रस घालून रसात अशासाठी नाही शिजवायचं कारण तांदूळ नीट शिजत नाही. म्हणून भात होत आला की मग टोमॅटो चा रस घालायचा. हा भात फ़ड्फ़डीत होत नाही. पण गरम गरम छान लागतो.

फ़क्त टोमटो चा रस घालून रसात अशासाठी नाही शिजवायचं कारण तांदूळ नीट शिजत नाही. म्हणून भात होत आला की मग टोमॅटो चा रस घालायचा. हा भात फ़ड्फ़डीत होत नाही. पण गरम गरम छान लागतो.

आउ