टिप:-'एसीपी मनोहर ' ही कथा अर्ध्यावर अस्तानाच प्रसिद्ध झाली.तिचा पुढील भाग ,माझ्या दि.२१-९-०७ च्या प्रतिसादामध्ये आहे . त्यापुढला भाग हा खालील प्रमाणे )
एसीपी मनोहरना ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा ,बाहेरच्या जगत हिंडण्यात जास्त आनंद वाटे . त्यानी परिचय होण्यासाठी म्हणून स्टाफ मिटींग घेतली . मिटींग मध्ये त्यानी सांगितले. ''आपले काम काय आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे . ते करा . त्यांचे अहवाल वेळच्यावेळी द्या . सबबी सांगू नका. गिव्ह युवर दि बेस्ट ! '' त्यांच्या नजरेत , चुकलात तर गय नाही , असा भाव होता.
मग त्यानी शहरातल्या महाविद्यालयांकडे मोर्चा वळविला . कॉलेज- कट्ट्यावर हजेरी लावली . तरूण - तरूणींची नेहमीच गर्दी असणाऱ्या कॅफेमध्ये बसून काही सिगरेटींचा धूर सोडला . यानंतर शहरातील प्रमुख वृत्तपत्रांना आणखी एक विधायक वृत्त छापावे लागले . ते वृत्त असे होते :-
शहरातील काही प्रसिद्ध महाविद्यालयातून चालणारे रॅगींग , नशायूक्त पदार्थांचा चोरटा व्यापार अन् अनैतिक धंद्यातील व्यक्तींचा वावर याबाबीकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळविला असून , त्यांनी कांही व्यक्तींना ताब्यात घेवून चौकशी सुरू केल्याचे समजते आहे . महाविद्यालयांमध्ये बदललेल्या वातावरणामुळे अनेक पालक , आपल्या मुला -मुलीबद्दल जीव भांड्यात पडल्याची भावना व्यक्त करून पोलिसांना मनापासून दुवा देत आहेत . ह्या नव्या बदलामागे नवीन आलेल्या एसीपी मनोहर यांचे दक्ष प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे .
_______________*_______________________*_______________________*______________
यानंतरचा कथाभाग लवकरच सादर करण्यात येईल.