काल ट्वेंटी-२० स्पर्धेत बाजी मारुन आलेल्या विजयी संघाचे जोरदार स्वागत आणि दिमाखदार विजयरथातुन मिरवणुक व त्यानंतर वानखेडे क्रिडांगणावर भव्य दिव्य सत्कार समारंभ वगैरे सर्व दिवसभर चालले होते. या सर्व प्रकाराकडे पाहुन असे वाटत होते कि जणु हे हिरो कुठले तरी युद्धच जिंकुन आलेले आहेत! राजकारणी लोकांनि तर लाज शरम सोडुन सर्व खेळाडुंना मागे बसवुन पुढच्या रांगेत स्वतः बसुन मिरवुन घेतले.
खेळाडुंवर पशांचा अक्शरशः पाउस पडला. तेव्हा मला आठवण झाली ती कारगिल युद्धाची! बिचारे आपले सैनिक, प्राणांचि बाजी लावुन सिमेवर अहोरात्र लढत होते, काहि जणांचे प्राण सुद्धा गेले! जे जगले वाचले त्यांच्यापैकी एकाचे तरी नाव आपल्या राजकारण्यांच्या स्मरणात आहे का? त्या विजयाचा असा समारंभ झाला होता का? त्या सैनिकांना कुणी 'राज-तिलक' लावला होता का? त्यांच्यावर कुणी पैश्यांचा पाउस पाडला होता का?
आणि सर्वांत महत्त्वाचे--- काल राजकारणी लोक सारा व्याप सोडून या भाकड विजयाची दिंडी नाचवत होते, स्वतः भोवती आरती ओवाळुन घेत होते, आणि मिडिया वाले सर्व काम धंदा सोडुन दिवस भर ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काहिही दाखवत होते ते सग़ळे कारगिल युद्धाच्या विजयाच्या वेळी कुठे होते?
हे सर्व पाहुन प्रत्येक आईला आपले मुल क्रिकेटपटु व्हावे असे न वाटले तरच नवल.
पण कधी कधी वाटते आपण आक्रोश करुन काही फायदा आहे का? आपल्यालाच मुर्खात काढतील!