|| अपूर्णतेचा त्याला, आरंभीच शाप आहे ॥

जीवन अता माझे, मरणा जवळी आले
मी हा जो बोललो, शेवटचाच आलाप आहे ॥

ठेऊ नकोस ऊराशी, कधी प्रेमास माझ्या
अपूर्णतेचा त्याला, आरंभीच शाप आहे ॥

केले जगाने आजवरी, सारेच पुण्य होते
माझेच फक्त कर्म, नेहमीच पाप आहे ॥

तु विसरलीस मजला, झाली कित्येक वर्षे
ओठी तरीही माझ्या, तुझ्याच नावाचा जाप आहे ॥

ऎसी कोणत्या प्रकारे, करीशी मोजदाद
देवा तुझ्याकडेही, मापात पाप आहे ॥

                    ......... नितिज....