पानीमें मीन प्यासी, फ़ोरवर्डेड कविता

सुखामागे धावता धावता  विवेक पडतो गहाण

पाण्यात राहुनही माशाची मग भागत नाही तहान

स्वप्न सत्यात आणताना दमछाक होते खुप

वाटी वाटीने ओतले तरी कमीच पडते तुप

बायका आणी पोरासाठी चाले म्हणे हा खेळ

पेसा आणुन ओतेन म्हणतो , पण मागु नका वेळ

करिअर होत जीवन मात्र, जगायच जमेना तत्रं

बापाची ओळख मुले सागंती, पेसा छापायच यत्रं

चुकुन सुट्टी घेतलीच तरी स्वत: पाहुणा स्वता:च्याच घरी

दोन दिवस कोतुक होतं नतंर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारु लागतात बाबा अजुन काहो घरी

त्याचांही दोष नसतो त्यानां सवयच नसते मुळी

क्षणिक ओदासिन्य येतं मात्र पुन्हा सुरु होतं चक्र

सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या

आतुन मात्र मातीच्या भीतीं कधीही न सारवलेल्या

आयुष्याच्या सध्यांकाळी मग एकदम जाणवु लागत काही

धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता आरशांत पाहायच राहुन गेलं

सुखाची तहान भागवता भागवता  समाधान दुर वाहुन गेलं

        कवी - अज्ञात