थरारक प्रवास.....(२)

प्रवासाला आता चांगली सुरुवात झाली होती. आकाश ही चांगले निरभ्र होते आणि पावसाची जरा देखील शक्यता वाटत नव्हती. शिर्डीला वैजापुर मार्गे जाणारा मार्ग पकडला आणि सुसाट वेगाने प्रवास सुरु झाला. बरेच दिवसांनी घरातील सगळे एकत्र प्रवास करत असल्यामुळे गप्पा गोष्टींनी ही वेग धरला होता. तसा प्रवासातील निम्मा रस्ता सुस्थितीत आसल्याने आणि जास्त अंधार पडन्यापुर्वी परतीचा प्रवास करायचा आसल्याने मी ही जरा वेगानेच गाडी चालवत होतो.

एकदाचे वैजापुर आले आणि कोपरगाव मार्गे आम्ही शिर्डीचा मार्ग पकडला. अतिशय खराब मार्ग आसल्यामुळे आता गाडीचा वेग मंदावला होता. सावकाश प्रवास करत आम्ही एकदाचा नाशिक शिर्डी महामार्ग पकडला आणि शिर्डीला पोहचलो.

दर्शनाच्या रांगेत तशी विशेष गर्दी नसल्याने ४५ मी. च्या आत मन भरुन दर्शन झाले. साधारण आता संध्याकाळचे ७ वाजले होते आभाळात आता काळ्या ढगांची गर्दी जाणऊ लगली होती. माझ्या मनात लवकरात लवकर पाऊस येण्याच्या आत घरी कसे परत जाता येईल याचे विचार मनात थैमान घालत होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर माझे बाबा म्हणाले की आपण प्रसादालयात जाऊन प्रसाद घेउयात म्हणजे आपला सोमवारचा ऊपवास सोडता येइल आणि परतिच्या प्रवासाला लागता येईल. पण प्रसादालयात थोडी गर्दि वाटल्याने आणि पावसात रात्रीचा प्रवास टाळुयात म्हणुन आपण लगेचच परतीच्या प्रवासाला लागु. माझ्या या मुद्द्याला बाबांसह सर्वांनी अनुमोदन दिल्याने आम्हि परतिचा प्रवास करायचे ठरवले.

येताना वैजपुर मार्गे लागलेल्या खराब रस्त्यामुळे दुसऱ्या एखाद्या चांगल्या रस्त्याने प्रवास करु शकतो का? असा विचार मनात आला आणि शिर्डीला नियमीत प्रवास करनाऱ्या एका मित्राला दुरध्वनी केला त्याच्या सांगण्यात एक पर्यायी मार्ग आहे आसे समजले आणि तो मार्ग म्हणजे कोपरगाव नवा महामार्ग. पण त्याने हे देखील सांगितले की ह्या मार्गावर एक उड्डानपुल अपूर्ण आवस्थेत आहे तेथील फ़लक कदाचित तुम्हाला रात्रिच्या अंधारात दिसणार नाही परंतु उड्डानपुलावर गेल्यावर सावकाश जा म्हणजे तुम्हाला पर्ययी मार्ग दिसेल.

मित्राच्या म्हणन्याप्रमाणे नव्या कोपरगाव महामार्गाने आमचा परतिचा प्रवास साधारण ८ वाजता सुरु झाला. मार्ग नावा बांधलेला असल्याने सुस्थितित होता आणि वहातुकहि खुप कमी होती त्यामुळे आता वेगात प्रवास सुरु झाला. आणि पहाता पहाता आम्हि त्या उड्डान पुलावर पोहोचलो देखिल. कालाकुट्ट अंधार मि म्हणत होता. माझ्या गाडिच्या समोर एक मातिचा ढिग आल्यामुळे मि वेग कमी केला आणि माझ्या लक्षत आले की हाच तो उड्डान पुल आहे ज्याच्याबद्दल आपल्याला आधी समजले होते की तो अपूर्ण अवस्थेत आहे. आता मि गाडी थांबवली पण मला प्रश्न हा होता की पर्यायी मार्ग कुठे आहे आणि दाट अंधारामुळे तो शोधणे कठीण झाले होते. तेव्हड्यात माला माझ्या उजव्या बाजुला एक गाडिचा दिवा दिसला आणि माझ्या लक्षत आले कि पर्यायी मार्ग उजव्या बाजुला आहे. त्या मार्गाहुन एक ट्रक येत होता तो आमच्या गाडीच्या जवळ आल्यावर त्याच्या वाहाकास मि विचारले कि उड्डान पुलाला हाच पर्यायी मार्ग आहे का? त्याच्या कडुन हो आसा दुजोरा आल्यावर मि गाडी त्या दिशेने वळवली.

हा पर्यायी मार्ग आसल्यामुळे तो कच्चा मार्ग होता आणि २,३ दिवसापुर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे त्यावर अतिशय चिख्खल झाला होता. पाण आता पर्याय नसल्याने मला त्याच मार्गाने गाडी चालवावी लागणार होती. थोडेसेच अंतर मि त्या चिख्खलातुन गाडी चालवली आसेल किर्रर अंधार आणि रात किड्यांचा कर्कश आवाजाने आता गाडीतील सर्व मंडळी स्तब्ध झाली होती मि ही जरा जास्त काळजी पुर्वक गाडी चालवत होतो.  मला गाडीच्या उजेडात असे लक्षत आले की आपण जातो आहेत त्या रस्त्याच्या उजव्या बाजुला एक कालवा तुडुंब भरुन वहात आहे आणि डाव्या बाजुला ऊसाची शेती आहे. गाडीचा वेग वाढवने शक्य नव्हते कारण वेग वाढवल्यास गाडी घसण्याची शक्यता खुप होती. एक दोन वेळा त्याचा अनुभवही आला मला. काही वेळा खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीच्या मागच्या बाजुस मार लागल्याचा आवाजही आला. सावकाशीने मी हा रस्ता पार केला आणि परत महा मार्गाला लागलो. सगल्यांनी एकदम सुटकेचा श्वास सोडला आणि गाडी आता परत भरदाव वेगाने गंगापुरच्या दिशेने धाऊ लागली.

आता रस्ता चांगला असल्याने सगळेजण निवांत झाले होते आणि रात्रिच्या थंड वाऱ्याच्या झुळुकांनी वातावण छान आल्हाददायक झाले होते म्हणुन मि आता मंद आवाजात कारटेप चालु केला आणि सुमधुर संगीताच्या सानिध्यात प्रवास सुरु करु लागलो. आता आम्ही गंगापुरला पोहोचलो होतो आणि मग तिथुन औरंगाबाद फ़क्त ४०,४५ कि.मी. होते.  गंगापुरला पोहोचलयावर आम्हाला एक T (ईंग्रजी अक्षर) मार्ग लागला मी थोडा गोंधळुन गेलो की नेमके कुठला मार्गने जायचे म्हणजे औरंगाबाद लागेल आणि तेव्हड्यात मला एक छोटीशी औरंगाबादच्या रस्त्याची दिशा दाखवनारी पाटी दिसली आणि मि त्या दिशेने गाडी वळवली.

क्रमशः