सुखाची सांगता..

दुर त्या क्षितिजावरी तो दिप का ती तारका
त्याकडे पाहून मजला उब ही लाभे किती
उब ही त्या तारकेची, का अंतरीचा ज्वार हा
शिकार करणार ती, हृदयात माझ्या वार का...

निष्णात आहे पारधी ती, अन विषय मी अजाणता
परजलेले शस्त्र असले पाहिले नव्हते कधी
बाण हा सोडताना, चेहऱ्यावरी कृतकृत्यता
ठरलो मी शिकार, अन हृदयात माझ्या आर्तता...

मारायचेच होते तर हार का हो घालता
उंच उंच नेवूनी स्वप्ने दाखवता किती
नेवूनी स्वर्गाजवळ नरकात का हो धाडता
कितीही उंच नेले तरी कडेलोट हीच सत्यता...

प्रेम कितीही उदात्त तरी तू दाखवलीस न्यूनता
तु माझीच होणार, वचनास या भूललो किती
परार्धात पाहताना हाती उरली शुन्यता
तोडलेस हृदयास माझ्या, ही सुखाची सांगता..

-ऋषिकेश दाभोळकर