शाही शेवया

  • एक वाटी शेवया, पाव वाटी खवा किंवा दाट साय, पाव वाटी साखर
  • दोन चमचे साजूक तूप, दोन मोठे चमचे बदाम + काजू + पिस्ते यांची भरडसर पावडर
  • पाव चमचा वेलची पावडर, थोडे दूध.
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

तासभर आधी बदाम + काजू + पिस्ते यांची भरडसर पावडर थोड्याश्या दूधात भिजत घालावी.

प्रथम रवा तूप सुटेपर्यंत कढईत भाजून घ्यावा. शेवया मोडून तुपावर गुलाबी रंगावर भाजून  घ्याव्यात. आता शेवया आणि खवा एकत्र करुन त्यात साखर घालून साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर ढवळत रहावे. नंतर त्यात भिजलेली बदाम + काजू + पिस्ते पावडर घालून दोन मिनिटे ढवळून खाली उतरवून गार होऊ द्यावे.

खव्याऐवजी साय घालणार असल्यास आधी शेवया तुपावर भाजून घेऊन मग त्यात साय, साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर ढवळत रहावे. कोरडे होत आल्यावर उतरवावे.

साखरेचे आणि खव्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करण्यास हरकत नाही.

मैत्रीण