वेड...

साद तुझी ऐकुनी मी रानी जावे,

फुलानफुलाच्या रंगामध्ये तुला पाहावे.

मातीमधुनी तुझा आगळा सुगंध यावा,

मैनेनंही शब्द न शब्द तुझाच गावा.

हसणे तुझे खळाळुनी निर्झर व्हावे,

पानोपानी तुझे नाव मला दिसावे.

हा तुझाच ध्यास नि तुझेच वेड का असावे?

तूच सांग,.. या वेडाला मी काय म्हणावे..?