भास!

हे स्वप्न जागेपणी की
सत्य भेटते भासातून
ते श्वास मोगऱ्याचे
तू माळलेस केसांतून...

वसंत आहे फ़ुलतो की
मोहरली माझीच काया
बहर साऱ्या ऋतूंचे
तू धाडिलेस श्वासातून...

हि फ़ुले झेलते अंगावर की
तू भेटसी लाख बाहुंनी
मधु साऱ्या फ़ुलांचा
प्राशिते तुझ्या ओठांतून...