ब्र !!

का गावात एक जमीनदार होता. गावाभोवतीची सगळी जमीन त्याच्या एकट्याच्या मालकीची होती. बाकीचे गावकरी त्याच्या जमिनीत कसून उदरनिर्वाह करीत. जमीनदारामुळेच आपले कुटुंब चालते ह्याची जाणीव असल्याने, गावातील कोणाचीही त्याच्याविरुद्ध `ब्र' काढायची हिंमत नव्हती...

.... पूर्वीच्या काळी, आणि आताही कुठेकुठे, घरातल्या बायकांना नवऱ्याविरुद्ध ब्र देखील काढायची मुभा नाही...

... त्याच्या दहशतीला सगळेच टरकून असल्यामुळे, कुणीही त्याच्याविरुद्ध ब्र काढायला धजावत नसे...

---- असा हा `ब्र' !!

----- हा शब्द मराठीत कुठून आणि कसा आला ? ब्र ला पहिले लिखित स्थान कुठे मिळाले?

शोधू या ?