का तुला पाहताना उमलतात स्वप्ने काही..?
मृदुल हळवी तरीही सलतात स्वप्ने का ही..?
क्षणाक्षणाने छळते रात ही अशीच मजला...
अंधारगूज जेव्हा उकलतात स्वप्ने काही...
सुने भकास जरी हे आकाश माझ्या मनाचे,
अलवार चांदण्यांची फुलतात स्वप्ने काही...
ही जादू तुझ्या स्वरांची भारते रान सारे,
वाट माझ्या पावलांची बदलतात स्वप्ने काही...