कळी एक भुंग्याला भुलवून गेली
पाहून तिला मती त्याची गुंग झाली
फुल कळीचे झाले पाहून वेडा झाला
पाहता पाहता फुलात सामावून गेला
केव्हा झाली संध्याकाळ कळले नाही
पडला अडकून काही एक चालले नाही
नाही तोडू शकला नाजूक तो पाश
भुगा करी लाकडाचा कसा येथे झाला हताश
नाही वेगळा मीही आहे त्या भुंग्यापरी
रेशीम पाशात या जातो विसरून दु:ख्खे सारी