संमेलनाध्यक्षांचे स्थानीयत्व नि निवडणुकीचे निकष

सध्या सांगली आणि सोलापूर संमेलनांच्या वातावरणामुळे चर्चेत आहेत. येथे एका वेगळ्या प्रश्नाला स्पर्श करावा वाटतो. सांगली संमेलनासाठी म.द. हातकणंगलेकर, इ. इ. तर सोलापूर संमेलनासाठी फैयाज, इ. इ. ची नावे येतात. वृत्तपत्रातील चर्चेवरून हे साहित्यिक किंवा कलावंत त्या त्या ठिकाणचे रहिवासी किंवा ते ठिकाण जन्मभूमी असलेले असतात. त्या परिसरातील रसिकांची त्यांनाच पसंती असणे समजू शकते. मात्र वृत्तपत्रांनी निवडणुकांचे वातावरण तापविण्यासाठी अशा मुद्द्यांचा वापर करावा का? मुख्य म्हणजे अशा निवडणुकीत उमेदवाराचे स्थानीयत्व हा उमेदवारीचा, प्रचाराचा किंवा निवडणूक निकालांच्या प्रक्रियेचा भाग असावाच लागतो का? किमान साहित्यिक कलावंतांनी तरी राजकीय पद्ध्ती बाजूला ठेवून निव्वळ कर्तृत्वावर किंवा वैचारिक मुद्द्यांवर निवडणुका लढवाव्यात.