---म्हणून

झेप घेण्याची ऊर्मी
मला तुझ्या पंखांनी दिली
पण आता मला दिसतं आहे---
पंख असून तुझं चाचपडत चालणं
--------की मला उंच गेलेलं
तुला डोळे भरून पाहायचं होतं म्हणून----