मोठं

फार दिवसांनी लक्षात आलंय
जग फारच मोठं झालंय।
चिमणी शाळा चिमणं घर
चिमणी पावलं तशीच नजर
आणखीन कसं छोटं झालंय
-----फार दिवसांनी लक्षात आलंय
थोडं हटणं थोडं रुसणं
थोडं चिडणं हळूच हसणं
सारं आता वेडं झालंय
----फार दिवसांनी लक्षात आलंय
सगळं आता आलंय कळून
मगे बघता वळून वळून
चुटपूट हुरहूर मागेच राहिलंय
--फार दिवसांनी लक्षात आलंय
सुस्तावलेलं वय विसावतंय
शेवट कुठे थकून विचारतंय
आलंय हे काय शून्य आलंय
----फार दिवसांनी लक्षात आलंय
जग मोजण्यात आयुष्य गेलंय
तरी अजून शून्यच आलंय?
सुरू करू--पण मनच दमलंय
फार दिवसांनी लक्षात आलंय
जग फारच मोठं झालंय-----