कळीची समजुत

ही कविता ऐक वर्षा पुर्वी लिहिलेली आहे. त्यावेळेस सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती.

ही मी लिहीलेली पहिली कविता. पसंत पडेल अशी अपेक्षा.

एकदा एक गंमत झाली
कळी उमलायला नाही म्हणाली ।।

आयुष्य थोडे, वेदना फार
या जगात मी नाही फुलणार ।।

सारे तिला समजवायला धावले
निसर्गाचा नियम मोडू नको म्हणाले।।

कळीची समजूत काही केल्या निघेना
तिला समजावयाचे कसे काही केल्या कळेना।।

इतक्žयात तिथे फुलपाखरू आले
कळीची समजूत घालू लागले।।

दीर्घायुष्य तुला हवे कशाला
क्षणभंगूर आयुष्यात शीक जगायला।।

आयुष्य थोडे असले म्हणून काय झाले
जगायचे थोडेच सोडायचे असते।।

रंग-गंधाची लयलूट करायची असते
दुसऱ्यांना सुखविण्यात सुख मानायचे असते।।

उमजले कळीला जीवनज्ञान
सोनेरी किरणांची ती बघू लागली वाट।।

वाऱ्यावर स्वार होऊन सुगंध पसरला
कळी फुलायचा आनंद सगळ्या झाला।।