शांताबाई शेळके यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ कार्यक्रम

मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी दि. १८ ऑक्टो. ला माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
http://www.eprasaran.com/
इथे मराठी चॅनेल.

भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.

कार्यक्रम सर्व मनोगतींनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

- प्राजु.