गीतासार : एका श्लोकात एक अध्याय

नमस्कार,

काल दसऱ्याला घरी गेलो होतो तेव्हा काही जुन्या कागदपत्रात "गीतासार : एका श्लोकात एक अध्याय" हा प्रकार सापडला, याचा कर्ता अज्ञात ( निदान मलातरी) आहे. जाणकारांना माहीती असेल तर कळवावा.

आवडले म्हणून सर्वांसाठी टंकीत आहे. 

अध्याय १

गेले कौरव पांड्व रणी वर्णी कथा संजय / ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मनी वाटे तया विस्मय

पाहे पार्थ रणी कुलक्षयी चित्ती विषादा धरी /युद्धापासुनि होऊनी विमुख ते टाकी धनुष्या दूरी//१//

अध्याय २

झाला अर्जुन शोक्मग्न वेदांत सांगे हरी/ आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी

घेई बाण धनु करी समर तू कर्तव्य ते आचरी/वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी//२//

अध्याय ३

अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान कथिसी/तरी का तू येथे मजकडूनी हिंसा करविसी

वदे ते पार्था ते यदुपति करी कर्म ते नियते/ फलेच्छा सांडुनि सहज मग नैष्कर्म घडते //३//

हे छान चालीत म्हणताही येते.प्रयत्न करुन बघायला हरकत नाही.

रोज ३ अध्याय-श्लोक टंकीन असे म्हणतो. पाहु या कसे जमते ते!

आवडल्यास कळवावे, टंकण्यास हुरुप येईल.

-विटेकर