'तू असा..' आणि 'तू तसा..' या दोन 'तूं' च्या मधे सापडलेली 'मी' कशी..? हे यातल्या कुठल्या 'तू' ला समजेल..? याचं ऊत्तर शोधत असताना, मनात आलेले विचार कागदावर उतरले...
'तू असा' सागरासारखा..
अथांग परी शांत,
'तू तसा' वादळासारखा..
सुसाट परी अलिप्त,
मानवेना मला तुझी शांतता..
सोसवेना मला तुझी अलिप्तता,
असे मझ्या मनीची ही अतृप्तता..
होईल का कधी याची पूर्तता ?
***************************
'असा तू' म्हणालास म्हणून..
लावून घेतले बरेच छंद,
'तसा तू' म्हणालास म्हणून..
बदलला नेलपॉलीशचाही रंग,
'असा तू' म्हणालास म्हणून..
संसारात मी झाले दंग,
'तसा तू' म्हणालास म्हणून..
वाट पाहणेही केले बंद...!!