दही वडा

  • उडीद डाळ - १ कप
  • हरबरा डाळ -१/४ कप
  • दही -२ कप
  • चिंच -१/४ कप
  • गूळ -१/४ कप
  • जीरेपुड
  • चाट मसाला
  • तीखट
  • तेल
४५ मिनिटे
१५-१६ वडे

  1.  उडीद डाळ आणि हरबरा डाळ रात्रभर भिजवून ठेववी.
  2. सकाळी बारीक वाटून घ्यावी.
  3. त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
  4. एका भांड्यात अगदी पातळ ताक (पाणीच)करून घ्यावे.
  5. कढईत तेल गरम करून मध्यम आकाराचे वडे तळावे.
  6. वडे कढईतून काढल्यावर लगेच ताकाच्या पाण्यात टाकावेत.
  7. थोड्यावेळाने अलगद काढून दुसऱ्या भांड्यात ठेवावे.
  8. दह्याचे घट्ट ताक करून त्यात थोडी साखर टाकून त्या दह्यात वडे २-३ तास भिजू द्यावे.
  9. एका भांड्यात चिंच आणि गूळ पाणी टाकून शिजवून घ्यावे.
  10. गार झाल्यावर चिंच कोळून घ्यावी. ही चिंचेची चटणी.
  11. दुसऱ्या भांड्यात दही पाणी न टाकता फेटावे. त्यात थोडी साखर टाकावी.
  12. वाढताना वडा ठेवून त्यावर आधी फेटलेले दही टाकावे,नंतर तिखट, जीरेपूड आणि चाट मसाला टाकावा.
  13. वरून चिंचेची चटणी टाकावी.
  1. दही वडे आधीच करून ठेवता येतात. त्यामुळे हा पाहुणे येणार असतील तर एक चांगला पदार्थ आहे.
  2. हरबऱ्याची डाळ न टाकता पण वडे करता येतात 
माझी आई