गीतासार: एका श्लोकात एक अध्याय (४,५,६)

अध्याय ४

हराया भूभारा अमित अवतारसी धरीतो/ विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो

नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसि/ समर्पी तू कर्मी मग तिळभर बद्ध नससी//४//

अध्याय ५

करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी/ त्यजी प्रेमद्वेषा धरुनी ममता जो निशिदिनी

जया चित्ता नाही पुढील अथवा मागिल मनी/खरा तो संन्यासी स्थिरमतिही संकल्प सुटुनी //५//

अध्याय ६

चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा/हा मी हा परभेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या जरा

जो सप्रेम सदा भजे तसा तो सर्वांभूती सम /ठेवी मद्गत चित्त त्याहुनी दुजा योगी नसे उत्तम//६//