सांग सखया तू येशील ना?
सांग सखया तू येशील ना?
आधार मजला देशील ना?
वादळ वारा तुफानी रात
सागरा आलय उधाण फार
किनाऱ्यावर तू नेशील ना?
सांग सखया तू येशील ना?
फुलला जरी वसंत बहार
बावर झालय मन हे फार
बहरास वेचुन घेशील ना?
सांग सखया तू येशील ना?
बिलोरी काचा बिलोरी मन
दूर अंतरात स्वप्नमहाल
जपून तेथे नेशील ना?
सांग सखया तू येशील ना?
निघून गेली ती धुंद रात
लावुन गेली जिवाला आस
सांग सखीस तू स्मरशील ना?
परतून सखया येशील ना?