ब्रोकोलीची भाजी

  • ब्रोकोली -१ कप
  • बेसन -१/२ कप
  • कॉर्नफ़्लोअर -१/२ कप
  • लसूण - २-३ पाकळ्या
  • अद्रक -१/२ इंच
  • कांदा -१/२
  • टोमॅटो सॉस -१/२ कप
  • तेल
  • हळद, तिखट,मीठ, हिंग
१५ मिनिटे

  1. प्रथम ब्रोकोली धुऊन छोटे तुकडे करून घ्या.
  2. एका भांड्यात बेसन, कॉर्नफ्लोअर, अद्रक-लसूण पेस्ट,तिखट, हळद, मीठ, हिंग पाण्यात भिजवून घ्यावे.
  3. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात ब्रोकोलीचे एक एक तुकडे पिठात बुडवून परतून घ्यावे.
  4. ते तुकडे पेपर नॅपकीन वर ठेवावे ज्यामुळे जास्तीचे तेल निघून जाईल.
  5. पॅनमध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्यावा.
  6. कांदा लाल झाल्यावर टोमॅटो सॉस टाकावा.
  7. त्यात ब्रोकोलीचे तुकडे टाकून चांगले हालवावे.

रस्सा जास्त पाहिजे असेल तर टोमॅटो सॉस जास्त टाकावा.

माझा प्रयोग