चारोळ्या..

दिवसानंतर रात्र

चोर पावलांनी येते,

चेहेऱ्यावर अश्रुंच्या खुणा ठेऊन

पहाटे हळूच निघून जाते..

****************************

एक दिवस असा आला

उरलं सुरलं घेऊन गेला

जाता जाता मागे मात्र

प्रश्नचिन्ह ठेऊन गेला..