'भारत भू' चा 'सूर्य' असशी, काय तुझी वर्णने..
क्रिकेट ने मंतरलेले, शरदामधले चंद्र चंदणे,
धावांचे ते पर्वत बघुनी, क्षण सुगंधीत होतो..
खेळत असता तू मैदानी, गंध त्यांचा दरवळतो,
क्रिकेट मधले गौरवस्थान, म्हणूनी जणू तुझा जन्म..
दिधला तुजला जन्म, ती माऊलीही किती धन्य,
दिन मांस अन् वर्षांसोबत, काळाचेही तुटले अंतर..
दमले नाही शरीर तरीही, क्रिकेट आधी बाकी नंतर,
जनात ओढ ही क्रिकेटची, तू बांधलीस वरूनी शाल रेशमाची..
किती काळ वाट पाहू मी, कितीदा करू याचना भेटीची,
गणती ना तयांची, तू करशील शतके किती..
मी कसे शब्द थोपवू माझे, हिंडती सूर आसपास किती...!!