१.
तिच्या डोळ्यांत पाहिलं की
कुणास ठाऊक काय घडतं..
एका कुरुप वेड्या बदकाच्या पिलाला
तो राजहंस असल्याचं स्वप्न पडतं...
______________________
२.
जाता जाता सहज विचारलं तिनं,
'तुला माझी आठवण येईल का?'
म्हणालो, ' नाही, ...
आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं'..
______________________
३.
ही जादू कोणती होते..
जेव्हा तुझा स्पर्श होतो..
माझ्या वेदनांनाही तेव्हा
केवढा हर्ष होतो..
______________________
४.
माझं लिहिणं..
शब्दांचा फोल पसारा..
निरर्थक.. कधी व्यर्थ असतो...
तुझं लिहिणं...
भावगर्भ..
कोऱ्या ओळींनाही किती अर्थ असतो..
______________________