शिल्लक.. १

चुरगळलेली पत्रं..
ओलावलेले क्षण..
सुन्न एकांत..
दुखावलेलं मन..

माझ्या आसवांची
सुकलेली धार,
गालावरच्या ओघळांचे
सलणारे वण...

तुला घातलेल्या शपथा,
मी घेतलेल्या आणा,
गुलमोहराखाली
भिजली आठवण...