शिल्लक...२

पाणावलेले डोळे..
जडावलेले श्वास...
एक पुसट चेहरा..
काही नुसते भास...

खुळ्या काही खुणा..
संदर्भ काही वेडे...
अधुऱ्याशा काही
स्वप्नांची रास...

वहीमध्ये जपलेलं
मोरपिस एक..
स्वप्निल आठवणींचा
स्वप्निल सुवास...