हे बंध प्रेमाचे

तिची माझी पुन्हा कधी भेट होईल का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा जुळतील का

हातात हात पकडायला नशीब चांगलं लागतं...

हातातला हात तसाच रहायला खरं भाग्य लागतं...

विलगलेले ते हात पुन्हा मिळतील का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा जुळतील का

रडका पिक्चर बघताना रडायलाही मजा येते...

पुसणारं कोणी असेल तर आसवांचीही धार लागते...

असे मला अश्रू कोणाचे पुन्हा पुसता येतील का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा जुळतील का

सणासुदीला गोडधोड जेवण्यात मजा आहे...

खिलवणारं कोणी असेल तर कडू कारलंही गोड आहे...

असं मला खिलवणारं परत कोणी भेटेल का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा तसेच जुळतील का

आपलं कोणितरी असणं यात खरा आनंद आहे...

आपण कोणाचंतरी असणं यात खरं सुख आहे...

मला परत कोणाचंतरी होता येईल का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा तसेच जुळतील का

संध्याकाळी समुद्रावरच्या सूर्यास्तात सौंदर्य आहे...

सोबतीला कोणी नसेल तर या आयुष्याचाच अस्त आहे...

मला पुन्हा सोबत देऊन कोणी माझा अस्त थांबवेल का

तुटलेले हे बंध प्रेमाचे पुन्हा जुळतील का

-निरू