पुरावा

आज जे ढळढळीत सत्य आहे,
           ते उद्या सापडेलही कुठल्यातरी सरकारी कागदावर - पुराव्यानिशी..

पण जेव्हा उलटलेली असतील काळाची पाने युगांच्या मापाने
तेव्हा,
   त्या सरकारी कागदाची चुटकीभर माती
   केव्हाच ब्रम्हांडात विलीन झालेली असेल...

दुःख याचे नाही, आणि असावेही का?

राग हा की - 
        तरीही मागत राहतात "पुरावे" काही बुद्धिवान निर्लज्ज आणि...
        गरागरा डोळे फिरवून इतर काही काढत राहतात बाजारू फतवे

आता सांगा,
प्रगतीच्या घोड्यांवर स्वार झालेल्या आम्ही तर्कशुद्ध माणसांनी पाडून टाकल्यावर...
५००० वर्षांनी कोणी काय पुरावा द्यावा कुठल्याश्या रामसेतू अडम्स ब्रिज चा?