व्हेजीटेबल जिरा भात

  • २ ते अडिच वाट्या बासमती तांदुळ,
  • पाच वाट्या पाणी, फोडणीसाठी २-३ चमचे तूप, जिर, ३-४ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  • गाजर २ (उभी बारिक चिरुन)
  • वाफवलेले मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी
  • दोन कान्दे पातळ उभे चिरुन
  • त्याशिवाय आवडत असेल तर सिमला मिरची पण घेउ शकता
३० मिनिटे
४ जण

तांदुळ धुवून त्यात पाच वाट्या पाणी घालुन ठेवावे. ( मी साधारण अडिच पट पाणी घेते.) नंतर एका मोठ्या पातेल्यात तूप घालावे. ते तापल्यावर त्याच्यात जिरं , मिरच्यांचे तुकडे घालवेत. मिरच्या जरा पांढरट दिसायला लागल्या की त्यात कांदा घालून परतावं. कांदा गुलाबी रंगावर परतल्यावर त्याच्यात गाजराचे तुकडे, चिरलेली सिमला मिरची घालावी. एकदा झाकण ठेवून वाफ काढावी. नंतर तांदुळ पाण्यासकट फोडणीत घालावे. एकदा चांगले ढवळून गॅस थोडा मोठा करावा. चवीपुरते मीठ घालावे. एकदा उकळी आली की वाफवलेले मटार आणि मक्याचे दाणे घालावे. चवीपुरती साखर घालावी. एकदा चांगल ढवळून घ्यावं. पाण्याची चव बघून मिठ वगैरे हव असल्यास घालव. नंतर पाणी आटत आले की गॅस मंद करून पातेल्याच्या खाली जाड तवा ठेवावा. पातेल्यावर झाकण ठेवून ५-७ मिनिट शिजू द्याव. मग गॅस बंद करून टाकावा. जरा वेळाने झाकण काढून गरम  गरम भात , बरोबर टॉमेटोच सार मस्त पापड घेवून जेवायला बसाव.....!

गरम टॉमेटो साराबरोबर मस्त लागतो हा भात.. मटार आणि मक्याचे दाणे वाफवलेले असतात म्हणून ते नंतर घालावेत. शक्यतो पिवळे मक्याचे दाणे वापरावेत.

पाकप्रयोग म्हणा हव तर!!