टॉमेटोचे सार

  • ७-८ लाल टॉमेटो
  • २ हीरव्या मिरच्या, आलं
  • कोथिम्बिर
  • कढिपत्ता ५-६ पाने
  • मीठ, साखर
३० मिनिटे
४ जण

प्रथम टॉमेटो शिजवून घ्यावेत. नंतर  ते उकडलेले टॉमेटो , १ मिरची, कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबिर, इंचभर आलं  अस ब्लेंडर ने घुसळून घ्याव. मग हे मिश्रण चाळणीतून कीन्वा गाळण्याने गाळून चोथा टाकून द्यावा. मग गाळलेला साराचा भाग मंद गॅसवर चवीपुरता मीठ, साखर, उरलेली कोथिंबिर , हवी असल्यास अजून एखादी मिरची घालून उकळून घ्याव. हे सार जरा गोडसरच चांगल लागते. नक्की करून बघा!

अस टॉमेटोच सार जेवण झाल्यावर जरा गार झाल की त्याच्यात मस्त पैकी ताक घालून प्यायच... मस्त लागतं!!

सासुबाइ...मस्त करतात..