घात

भर गर्दीचा बाजार होता
माणुसकी फक्त व्यवहार होता

मुखवटे होते चेहऱ्यावरती
आकांत सारा मनात होता

स्वप्ने होती डोळ्यात किती
पायास व्यवहारी चाप होता

मृगजळामागे धावले किती
दैवास त्यांच्या शाप होता

कोलाहल उसळला चोहीकडे
स्वकीयांनी केला घात होता