सायीच्या वड्या

  • १ वाटी साय, १ वाटी साखर
३० मिनिटे

साय व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून मध्यम आचेवर शिजत ठेवावे. घट्ट होत आलं की गॅस बंद करून २ मिनिटे सतत ढवळावे. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण पसरवून वड्या कापाव्या.

सतत ढवळर राहावे म्हणजे पांढऱ्याशुभ्र वड्या होतात.  वडी तोंडात टाकली की विरघळते.मधुर व करायला सोप्या अश्या ह्या वड्या दिवाळीत नक्की करून पहा.

मावशी