खुरचंद वडीची पाककृती हवी आहे

सधारणपणे मोहनथाळ सारखा हरबऱ्याच्या डाळीच्या पिठापासून केलेला एक मिठाईचा प्रकार पूर्वी नाशिकमध्ये मिळत असे. बेसनवड्या अथवा बेसनाची बर्फी म्हणता येईल असा तो प्रक्कर असायचा. त्यात बेसनाबरोबरच कांही प्रमाणात खावा आणि खोबऱ्याचा कीस (डेसिकेटेड कोकोनट) असायचा. हल्ली ही मिठाई पूर्वीच्या चवीची मिळत नाही. त्यातून खवा-खोबऱ्याचा समावेश वगळलेला असावा अशी मिळते. सध्या जी खुरचंद वडी मिळते ती मोहनधाळ असते. कांही मिठाईवाले तर मोहनथाळ म्हणजेच खुरचंद वडी असेही ठोकून देतात. खुरचंद अग्रवाल नामे कोणा मिठाईवाल्याने हा मिठाईचा प्रकार शोधून काढला, म्हणून त्याचे नाव त्या मिठाई प्रकाराला मिळाले अशी एक वदंता आहे. मूळ खुरचंदवडीची पाककृती कोणास माहिती असल्यास त्यांनी ती कृपया मनोगतवर द्यावी ही विनंती.