बाथरूमची महती...

घामटलेले, अस्वच्छ आणि पारुसे ते देहं...
जिथे न्हाऊन चारचौघात बसण्याच्या लायक होतात,
आणि एरवी एक शब्ददेखिल न गुणगुणनारे...
जिथे जाऊन तारस्वरात गाणारे पट्टीचे गायक होतात,
अशा या सुंदरशा जागेची, व्वाह काय बात आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!

"युरेका..." असे शास्त्रज्ञ तिथेचं का ओरडला??
कारण ती डिस्कव्हरी अजून कुठे होतंच नाही फीट,
आणि बाथरूम मध्ये नटत-मुरडत गाणं गायल्याशिवाय...
बॉक्स-ऑफिसावर नायिका ही नाही होत हल्ली हिट,
विज्ञानापासून मनोरंजनपर्यंत, सर्वांना त्याची साथ आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!

तुम्ही म्हणाल "काय बाथरूम-बाथरूम लावलंय??"
पण एक उदाहरण देतो म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटेल,
लिविंग किंव्वा बेडरूम मध्ये दाढी करत बसलेला नवरा...
तुमच्यापैकी किती बायकांना हो हवा-हवासा वाटेल?,
तुमचं नातं कसं मजबूत करावं, हे ही त्याला ज्ञात आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!