बाथरूमची महती...

घामटलेली, पारोसी आणि अस्वच्छ अशी शरीरं...
जिथे न्हाऊन चारचौघात बसण्याच्या लायक होतात,
आणि एरवी कघी एक शब्ददेखिल न गुणगुणणारे...
जिथे जाऊन तारस्वरात गाणारे पट्टीचे गायक होतात,
अशा त्या सुंदर छोट्याशा रूमची, व्वाह काय बात आहे!
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!!

"युरेक्क्क्क्क्का" असे शस्त्रज्ञ तिथेचं का ओरडला??
कारण ती डिस्कव्हरी अजून कुठेही फिट होत नाही,
आणि बाथरूम मधील सेक्सी सीन किंवा गाण्याशिवाय...
सिनेतारका बॉक्स-ऑफीसावर रातोरात हिट होत नाही,
विज्ञानापासून मनोरंजनापर्यंत, सर्वांनाच त्याची साथ आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!

तुम्ही म्हणाल "काय बाथरूम-बाथरूम लावलंय??"
पण एक उदाहरण देतो म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटेल,
लिविंग किंव्वा बेडरूम मध्ये दाढी करत बसलेला नवरा...
तुमच्यापैकी किती बायकांना हो हवा-हवासा वाटेल?,
तुमचं नातं कसं मजबूत करावं, हे ही त्याला ज्ञात आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!