खमंग ढोकळे

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मूग डाळ
  • ताक
  • हिरवी मीरची
  • अद्रक
  • जीरे
  • तेल
  • हिंग
१५ मिनिटे

  1. तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ सम प्रमाणात घ्यावी.
  2. स्वच्छ धूऊन १५ मी. पाण्यात ठेवावी.
  3. पाणी काढून कापडावर वाळत घालावी.
  4. चांगली वाळल्यावर गिरणीतून रवा काढून आणावा. मिक्सरमध्ये पण करता येतो.
  5. हे पीठ हवा बंद डब्ब्यात घालून ठेवावे. दोन महिने चांगले राहाते.
  6. ढोकळ्याचे पीठ ताकात ५-६ तास भिजवावे.
  7. अद्रक - हिरवी मिरची बारीक करून पीठात टाकावी.
  8. हिंग व चवीप्रमाणे मीठ टाकावे.
  9. कूकरच्या डब्याला तेल लावून त्यात पीठ टाकावे.
  10. कूकरला शिट्टी न लावता १० मिनीट वाफवावे.
  11. ईडली पात्रसुद्धा वापरता येते.
  12. ढोकळे झाल्यावर त्याचे काप करून जीऱ्याच्या फोडणीत परतून घ्यावे.
  1.  सॉस बरोबर छान लागतात. फोडणी न करता पण छान लागतात. फोडणीत कडीपत्ता व कोथिंबीर टाकावी. छान लागते.
  2. ढोकळा जास्त फुगावा म्हणून एक चमचा तेल आणि सोडा पण टाकतात. मी टाकत नाही.
गुजराथी मैत्रीण