हातांनी या लिहीत जावे पानांवर या मांडत राहावे
मनी जे असे स्वप्नी ते वसे आयुष्याच्या या वाटेवरती
तारुण्यातील पाखरांना गंध प्रेमाचा दिसे
हे घडते कसे हे घडते असे
जुलमी हे डोळे करतात एका क्षणात घात
एकाच दृष्टीक्षेपात दोन जीवांचे हात हाती येतात
तारुण्याच्या या धुंदीला म्हणावे तरी काय
अखंड ध्येयाच्या दिशेने चालताहेत हे पाय
स्वप्नपूर्ती जरी झाली या जीवांची
तरी या हातांना हे यश मिळेल
या पानांना कुठेतरी थोडासा
हो मान मिळेल
खरच,
हातांनी या लिहीत जावे
पानांवर या मांडत रहावे.