रात्रीच्या प्रकाशात
रूणझून वा~यात
मला तुझी आठवण येते
बोच~या गारव्यात
तूझा शांत चेहरा
जसा नभी चंद्र गोरा
छमछम तूझ्या पैन्जनाची
जनू खळखळनारा झरा
हसन तूझ खुदकन
बहरून यायचा प्रत्येक क्षण
निर्मळ तूझ हळव मन
जस पावसाच ओलेपन
विरहाची तूझी आगतीकता
माती सुर्य धगधगता
आठवांचे आता गीत गाता
जगतोय मी मरता मरता......
-अमोल