तू म्हणतेस विसर

तू म्हणतेस विसर...

तू म्हणतेस विसर, पण

सांग तूला मी विसरू कसा?

पाऊस पडेल हिरवाई होईल

सप्तरंगी फुलांची बरसात होईल

तूझ्या आठवणींचा पाऊस हा असा

सांग तूला मी विसरू कसा?

वैषाख वनव्यात हिरवाई जळेल

तूझ्या आठवणीने हृदय ही पोळेल

तूझ्या विरहाचा वैषाख हा असा

सांग तूला मी विसरू कसा?

गुलाबी थंडीतील बोचरा वारा

डोळ्यांतून वाहतील आसवांच्या धारा

तूझ्या दूरव्याचा गारवा हा असा

सांग तूला मी विसरू कसा?

तू म्हणतेस विसर, पण

सांग तूला मी विसरू कसा?

-अमोल