मैत्रेय

तूझ्यासारखे पाहीले आहेत मी खूप

वेळप्रसंगी बदलतात जे आपले रूप

सुखात शामील केलेस तू

दुखातही साथ दिलीस

वाटले मित्रत्वाचे नाते

निभवशील जन्मभर तू

दिवस बदलतात म्हणून आपनही का बदलायच

मित्रत्वाच नात अस वैरत्वात बदलायच

खांद्याला खांदा लावून चढलो

आपन आयुष्याची पायरी

नव्हते माहीत मैत्रीच्या पडद्यामगे

तूच होतस माझा वैरी

असो वैरत्वाच्या गोष्टित

काहीच अर्थ नाही

एकमेकान्शी  लढून असे

काहीच मिळनार नाही

म्हणून अजुनही तू विचार कर

अजुनही हृदयात आहे माझ्या

मित्रत्वाची सर.............

                           अमोल