आपण दोघे

तूला नेहमी मी समजवायचो

तूल मात्र कहीच समजायच नाही

पत्वून घेण तूला जमतच नव्हत

तू करायचीस आपलच खर

तूला समजवन्यात, सावरन्यात

मी पूरता थकून जायचो

पण तूझा वाद संपायचाच नाही.

तूझी बडबड ऐकत

मी पाठम्होरा होई

तूझ्या ते ध्यानात येताच

सागराप्रमान तू शांत व्हायचीस

हळूच केव्हा पाठीमागे येऊन

पाठीवर माझ्या बिलगायचीस

तूझा चेहरा ओन्जळीत घेवून मी

कितीतरी वेळ तुला पहायचो

तू मात्र डोळे मिटून

दोन आसव ढाळायचीस

ओघळना~या थेंबानी

हात माझे ओलेचींभ भीजायचे

आजही हात माझे

तूझ्या आसवानी भीजतात

फक्त तुझा चेहरा कुठेतरी हरवलाय

सध्या वादही मी स्वाताशीच घालतोय

स्वताची समजूत काढून

माझा मीच सावरतोय.....

                               अमोल