पाऊसवेडी.....

पुर्वी पावसाळा मला फार आवडायचा

पण आता मात्र तो मला आवडत नाही

तूला पावसाळा फार आवडायचा

आणि म्हणून मलाही...........

आपल्या पहिल्या भेटिचा पाऊस

मला अजूनही आठवतोय

कोसळना~या पावसात, ओल्याचींभ रानात

तू लहान मुलीसारखी नाचायचीस

विजांचा कडकडाट, पाऊसाचा मार

पायखालचा चिखल, सार विसरून तू

पावसाला अलगत झेलायचीस.......

पाऊसही तुझ्याशी मित्रासारखा वागायचा

तू थकल्यावर आपल बरसन थांबवयचा

तूझा लटका राग पाहून मग

पून्हा रानभर कोसळायचा

पाऊसाचा निरोप घेवून तू

तूझ्या घराकडे निघायचीस

पाऊससुद्धा तूझ्या मागोमाग

तूझ्या अंगणापर्यंत यायचा

तू घरात गेल्यावर मात्र

रिमझीम उंबरठ्यावर करायचा

तू झोपी गेल्यावर मग

हळूच आभाळात साठायचा.....

अशाच पाऊसात तू मला भेटली होतीस

मग कितीतरी आपल्या पाऊसभेटी

मी काहीतरी सांगनार इतक्यात

पऊस अचानक बरसायचा

माझ बोलन न ऐकताच

तू पावसाशी खेलू लागायचीस

पावसाबरोबर नाचताना तू

मलाही पावसात ओढायचीस

अशाच पावसात भीजून तू

माझ्या मीठीत आली होतीस

मनातल सार माझ्या जाणून

तू गोड हसली होतीस

माझ्या मनातले सारे बोल

तूला पावसानेच सांगीतले असनार

म्हणूनच तूझ्याईतकीच

पावसाचीही मी वाट पाहनार

पाऊस निघून गेल्यावर

तूही अशीच निघून गेलीस

पावसाला आपल करून तू

मला मात्र अश्रू दिलेस

आता पाऊस कितीही कोसळलातरी

मी मात्र भिजत नाही

भिजतात त्या तूझ्या आठवणी

आणि पाऊसाईतकच डोळ्यातही पाणी

पाऊस आणि मी तूझ्यासाठीच वेडे

तू मात्र पाऊसवेडी

म्हणून पाऊस मला आता आवडत नाही

तू पावसाची...पाऊस तूझा....

मी मात्र वेडा त्या पाऊसवेडीचा..............

                                            -अमोल