सगळीकडे पाणीचपाणी
नदिच पात्र भिजलेल
सारी जमीन भिजुनही
आभाळ अजूनही साठलेल
रस्त्यामधल्या खड्ड्यामध्ये
पाय कुणाचा अडखळला
पून्हा रस्त्याला येऊन
पूढे कोण तो पळाला?
डबक्यातल्याही पाण्यामध्ये
लाट कशी ही फेसाळते?
सागरापेक्षा`या अफाट मनात
जहाज कुणाचे हेलकावते
भिजलेल्या या अंगामध्ये
श्वासाची मात्र आग होते
थरथरना~या या हातामध्ये
एवढे बळ कुठून येते
पूरामध्ये खोल बुडून
ध्यानस्त हा कोण निजला
हा तर मीच.... निर्जीव!
बाजूला माझा प्राण बसला........
-अमोल