थोर माणसानो तूम्ही
खरच अभागी ठरलात
ईतरांच्या सुखासाठी 'फुकट'
चंदनापरी झिजलात
दूस`~यासाठी तुम्ही आजपर्यंत
काय नाही केलत?
रक्ताच पाणी झाल तुमच्या
दुखाचे डोंगर झेलत
स्वार्थाचा त्याग करून तुम्ही
मरना~याना जगवलत
'दुस~यान्साठी जग' अस
मनाल्या आपल्या धजवलत
तुमच्या उपकारांची फेड म्हणून
तुमचे यानी पुतळे उभारलेत
तुमची शिकवन कोन पाहतय
बांधना~यांचे आता भाव वधारलेत
'कोमेजलेली मने' ह्यांची
तुम्हाला ताजी 'फुले' वाहतात
निमीत्त तुमच पूढे करून
राजकरनाची भाषणे करतात
पूतळ्याचे तुमच्या आज ईथे
शस्त्र केले जाते
माणूसकीला काळिमा फ़ासून
तुमची मात्र विटंबना होते.......
-अमोल