ती एक नार...

ती एक नार

करूनी श्रुंगार

केश संभार

जिव्हारी वार

नयनाची अदा

पाहूनी फिदा

नजरेनी सदा

मारे कितीदा

मारती हाक

मुरदती नाक

रागाचा धाक

पळती हे काक

चालता कहर

थांबता जहर

अंगात बहर

नख~याची लहर

ओठांच्या कळ्या

जणू फुलपाकळ्या

रंग लाल जूळ्या

करिती खुळ्या

मानेचा झटका

मग राग लटका

शोधती भटका

खाऊनी फटका

शोधती सारे

कुठे गेली रे

मोजती तारे

भर दिवसा रे.........

              -अमोल